आता मिळणार ७५ व ८० टक्के सबसिडी तेही ठिबक व तुषार सिंचनावर
Now We
Will Get 75% And 80% Subsidy On Drip And Sprinkler Irrigation
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (प्रति थेंब अधिक
पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन 2017 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान (केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के) कमाल 5 हेक्टर
क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते.
शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी
करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार
सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘Thibak
Sinchan Yojana Maharashtra’
या
योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर
शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत
देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक
भार राज्य शासन उचलणार आहे, अशी
माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे. (Farmers
will now get drip irrigation on 75 and 80 per cent subsidy)
या
योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व
नक्षलग्रस्त अशा एकूण 246 तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित 106 तालुक्यांचा समावेश करुन सदर
योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत
घेतला आहे.
यामुळे
राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये
आतापर्यंत 25.72 लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक
शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल.
सन 2021-22
या
आर्थिक वर्षाकरिता रु.589 कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना
‘मागेल
त्याला ठिबक’ या तत्त्वावर
राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा
शासनाचा मानस आहे.
लाभार्थ्याची
पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन
पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज
महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा
असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.
असा करा
ऑनलाइन अर्ज.
·
तुमच्या कॉम्प्युटरच्या वेबब्राउजरमध्ये टाईप करा Mahadbt
farmer login,
·
महाडीबीटीची शेतकरी वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरवर ओपन होईल.
·
तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर तो वापरून लॉगीन
करा किंवा तुमची नोंदणी करून घ्या आणि युजर आयडी आणि पासवर्ड मिळवा.
·
लॉगीन केल्यानंतर अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक
करा.
·
या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सिंचन साधने व सुविधा
या पर्यायावर क्लिक करा.
·
सिंचन साधने व सुविधा असा एक फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल
या ठिकाणी योग्य माहिती भरा.
·
जतन करा या बटनावर क्लिक करा.
·
पहा या बटनावर क्लिक करा.
·
अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
·
जेवढ्या योजनांसाठी अर्ज केला असेल त्या योजनांना प्राधान्य
द्या.
·
पेमेंट करा या बटनाला टच करा.
अनुदानासाठी ऑनलाईन पेमेंट
करण्याची पद्धत.
·
पेमेंट करण्यासाठी योग्य ती पद्धत निवडा.
·
डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, क्यू आर कोड स्कॉनिंग आणि upi असे पर्याय दिसतील यापैकी एक
पर्याय वापरून तुम्ही पेमेंट करू शकता.
·
पेमेंट करत असतांना कृपया पेजला रिफ्रेश करू नये.
·
यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.
अशा
पद्धतीने तुषार सिंचन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केला जावू शकतो.
इतर सरकारी योजना
पाहण्यासठी येथे क्लिक करा.