येथे पहा 12 वीचा निकाल. व रोलनंबर शोधा - HSC Result 2021
१२ वी निकाल २०२१ | ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४ वाजता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थीचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दि. ०३ ऑगस्ट २०२१ दुपारी ४ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थीचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.
हझह्ज
महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) उद्या 4 वाजता बारावीच्या निकालाची घोषणा ऑनलाईन करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे.
यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे. दहावी निकाल २०२१ च्यावेळी ही वेबसाइट बंद पडली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने हा प्रकार बारावी निकालाच्या बाबतीत होऊ नये याची काळजी घेतली आहे.
बारावी निकालाच्या तारखेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. मीडिया रिपोर्टनुसार बारावी निकाल २०२१ हा २ ऑगस्ट २०२१ ला जाहीर होऊ शकतो. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार आहे.
सौजन्य - महराष्ट्र टाईम्स
Who
ReplyDeleteWhat
ReplyDelete