अर्ज भरणे सुरु - 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा - CET -FYJC CET Exam -अकरावी

 

11 वी प्रवेशासाठी CET परीक्षा - CET -FYJC CET Exam -अकरावी;

 

11 वी नविन पोर्टल सुरु आज पासून भरता येतील अर्ज

या आधी अर्ज भरला असेल तरी परत अद्यावत करावा लागेल.

पोर्टल आज दुपारी 3 वाजे नंतर सुरु होणार आहे.

सुरु झल्या नंतर लिंक उपलब्ध केल्या जाईल

अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

 


 

FYJC CET 2021 CET For 11th Admission

State Secondary Board President Dinkar Patil said that the Common Entrance Test (CET) for the first time this year will be held till August 21. The application process for the CET will start on July 19, for which a separate portal will be set up, the board said. A link to the portal will be made available on the board’s official website, and students will be able to decide whether to take the CET.

 



सीईटी’ दृष्टीक्षेपात

·       १९ जुलैला अर्ज प्रक्रिया सुरू होणार.

·       राज्य माध्यमिक मंडळाच्या वेबसाइटद्वारे ‘सीईटी’साठी स्वतंत्र पोर्टल.

·       २१ ऑगस्ट पर्यंत परीक्षा घेण्यात येईल.

·       सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम देणार.

·       सीईटी देणे बंधनकारक नाही.

·       सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात.

·       सीईटी ऑफलाइन पद्धतीने होणार.

 

 

राज्यात अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा १०० गुणांची असणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी चार विषयांची निवड करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मराठीचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

11th CET Exam- अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा अशी होणार-जाणून घ्या

 

ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. तसेच ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.

                       

FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

 

प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर या परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अंतर्गत एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे

 सौजन्य - म. टा.

 

FYJC Online Admission 2021

FYJC Online Admission: The Department of Education has decided to give one last chance to the students who have not yet got admission in Class XI. Accordingly, there will be a final round for students deprived of this admission.

 CET अर्ज भरण्याची लिंक आपल्या blog वर लवकरच उपलब्ध होईल त्यासाठी दरोरोज भेट द्या

 


 

 

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area