हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? - How to convert Hector's Guntha to Acre?

हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?

जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !

 

आपण पूर्वीचे सातबारा उतारे किंवा जमिनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, चौरस फूट या मोजमाप एककाचा वापर पाहायला मिळायचा. पण सध्याच्या काळात जास्त करून हेक्टर, आर आणि चौरस मीटर या एककाचा वापर केला जातो.

मग हे हेक्टर म्हणजे किती जमीन असते?


 

हेक्टरच रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे चौरस मीटर मध्ये कसे करायचे किंवा एकर मध्ये कसं करायचे: पहिला प्रश्न येतो की हेक्टर म्हणजे काय किंवा हेक्टर म्हणजे किती जमीन असते? एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर (१हेक्टर=१०००० चौ.मी.) असतात.आपल्याला तर माहितीच आहे एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो. मग आता या हेक्टरचे गुंठयामध्ये एकर मध्ये आर मध्ये किंवा चौरस फूटा मध्ये चौरस मीटर मध्ये रुपांतर कसं करायचं या संबंधित माहिती आपण घेऊया.

आपण जर सातबारा उतारा पहिला तर त्यामध्ये आपल्याला हेक्टर आणि चौरस मीटर असे शब्द पाहायला मिळतो हेक्टर मध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही दहा हजार चौरस मीटर उरतील त्याचे रूपांतर हेक्‍टरमध्ये करून दिलेलं असतं त्यानंतर दुसरा शब्द जो असतो आर.

आर म्हणजे 100 चौरस मीटरचा 1 आर असतो. त्यानंतर आपल्याला चौरस मीटर हा शब्द दिलेला असतो. आपण काही महत्वाचे फॉर्मुले आहेत हेक्टरचे रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करण्यासाठी ते आता पाहूया. जर आपल्याला हेक्टरच रूपांतर आर मध्ये करायचे असेल, तर आर बरोबर हेक्टर गुणिले शंभर(आर=हेक्टर*१००) म्हणजे जे काही आपल्याला हेक्टर मध्ये दिलेले असतील त्याला गुणिले 100 करायचे आपल्याला आत मध्ये रूपांतर मिळून जाईल चौरस मीटर बरोबर हेक्टर गुणिले 10000 (चौ.मी=हेक्टर*१००००) म्हणजे आपल्याला काय करायचं आहे.

जेवढे हेक्टर असतील त्याला गुणिले 10000 करायचं आपल्याला चौरस मीटर मध्ये उत्तर मिळून जाईल चौरस फुट बरोबर हेक्टर गुणिले एक लाख सात हजार सहाशे एकोंचाळीस (चौ. फू.=हेक्टर*१०७६३९) म्हणजे आपल्याला काय करायचे जर आपल्याला चौरस फुटामध्ये हेक्टरचे रूपांतर करायचे असेल, तर हेक्टरला गुणिले १०७६३९ करायचे कारण एका हेक्टर मध्ये एक लाख सात हजार 639 चौरस फूट असतात गुंठा बरोबर हेक्टर गुणिले 98.84 (गुंठा=हेक्टर*९८.८४) हा महत्त्वाचा फॉर्मुला आहे कारण जास्त करून आपल्याला गुंठ्यामध्ये रूपांतर करायचं असतं.

त्यामुळे जे काही एक तर आपल्याला दिले असतील त्याला गुणिले 98.84 करायचे आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळून जाईल. एकर=हेक्टर*२.४७१ म्हणजे जर आपल्याला हेक्टरचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर जेवढे हेक्टर असतील त्याला गुणिले 2.471 करायचं, म्हणजे आपल्याला एकर मध्ये उत्तर मिळून जाईल हे फॉर्मुले मी दिलेले आहेत ह्या फॉर्म्युलाच्या आधारे आपण हेक्टरचे रूपांतर गुंठ्यामध्ये, एकर मध्ये, चौरस फुटामध्ये, चौरस मीटर मध्ये, किंवा आर मध्ये सहजपणे करू शकतो.

 

चौरस मीटर = हेक्टर  x 10000

चौरस फुट = हेक्टर  x 107639

गुंठा हेक्टर  x 98.84

एकर = हेक्टर  x 2.471

1 गुंठा = 1089 चौ फुट

1 आर =1076.39  चौ फुट

1 एकर  = 40 गुंठे

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area