MAHA TET 2021 Admit Card Available – MAHA TET २०२१ चे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.

 

MAHA TET 2021 Admit Card Available – MAHA TET २०२१  चे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.

 

Maharashtra Teacher Eligibility Test - 2021, Maha Tet Hallticket, Maha Tet Hall Ticket 2021, Maha Tet Hall Ticket 2021 Download, Maha Tet Admit Card 2021, Maha Tet Admit Card 2021 Download Link, Tet Admit Card Mahatet Admit Card, New Admit,MSCE PUNE  Card,TMSJOB, TMS JOB,

 


MAHATET 2021 चे प्रवेश पत्र आपल्या लॉगीन मध्ये उपलब्ध झाले आहे, खालील लिंक वर क्लिक करून आपला आयडी व पासवर्ड नोंद करून आपले प्रवेशपत्र पाहावे.

 

परीक्षा दिनांक

21 नोहेंबर  2021

प्रवेशपत्र

येथे पाहा.

WhatsApp गृप

गृप लिंक

 

खालील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचावी व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची नोंद परिक्षार्थीने घ्यावी.

१.प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात व परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही.

२.ऑनलाइन आवेदनपत्रात नमूद केलेले फोटो ओळखपत्रही (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन्स) स्वतःजवळ ठेवावे व प्रवेशपत्रासोबत दाखवावे. ज्या परिक्षार्थीचे नावात बदल आहे अशा परिक्षार्थानी राजपत्र अधिसुचना, विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र (AFFIDAVIT) परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावरील नाव व ओळखपत्रावरील नाव सारखे असल्याची परिक्षार्थीने खात्री करावी.

३.ज्या परिक्षार्थींनी पेपर एक व दोन साठी नोंदणी केली आहे त्या परिक्षार्थ्यांना दोन प्रवेशपत्रे मिळतील याची नोंद घ्यावी. आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक वेगवेगळे (स्वतंत्र) असतील.

४.परिक्षार्थीने परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत एक दिवस आगोदर खात्री करून घ्यावी. परीक्षा सुरु होण्यापूर्वी ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रात व पेपर सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे आधी परीक्षागृहात परिक्षार्थीला प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राचे अंतर लक्षात घेऊन परिक्षार्थनि प्रवासाचे नियोजन करावे. मुंबई / मुंबईउपनगर मधील परिक्षार्थीनी मेगाब्लॉकचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.

५.परिक्षार्थीनि मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजीटल डायरी अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य किंवा पुस्तके, वह्या इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे (प्रवेशपत्राशिवाय) परीक्षा केंद्रावर आणू नयेत. असे साहित्य केंद्रावर / परीक्षागृहात आणण्यास, बाळगण्यास व वापरण्यास मनाई आहे.

६.उत्तरे लिहिण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील व उत्तरपत्रिकेवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

७.परिक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेलीच उत्तरपत्रिका (OMR) प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा.

८.उत्तरपत्रिकेवर परीक्षागृहात प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संचकोड (A/B/C/D) अचूक नोंदवा व त्या समोरील संबंधीत गोल अचूक रंगवावा.

९.उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरीसाठी दिलेल्या चौकटीत परिक्षार्थीने स्वाक्षरी करावी. तसेच समवेक्षकाची विहित ठिकाणी स्वाक्षरी घ्यावी.

१०.परिक्षार्थीनि संचकोड (A/B/C/D), उत्तरपत्रिका क्रमांक स्वाक्षरीपटावर नमूद करून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

११.पेपर ॥ साठी परिक्षार्थ्याने निवडलेल्या ऐच्छिक विषय ऐनवेळी बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.

१२.उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगु, गुजराती, सिंधी माध्यमाच्या परिक्षार्थ्यांनी या परीक्षेसाठी निवडलेल्या द्वितीय भाषेची (मराठी किंवा इंग्रजी) नोंद बरोबर असल्याची खात्री करावी.

१३.उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदविलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरविलेले गोल, खाडाखोड अथवा एकाच प्रश्नासाठी दोन गोल गिरविलेले असतील तर, अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत, याचीही नोंद घ्यावी.

१४.प्रश्नपत्रिकेमध्ये सलग विभागनिहाय एकूण १५० प्रश्न असून ते सोडविण्यासाठी परिक्षार्थीस १५० मिनिटे (अडीच तास) वेळ देण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक राहील.

१५.प्रत्येक प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून प्रश्नाच्या खाली क्रमांकासह उत्तराचे पर्याय दिलेले आहेत. उत्तरपत्रिकेत उत्तर नोंदविताना चार पर्यायांपेकी बरोबर उत्तर असलेल्या पर्यायाचा क्रमांक निवडून उत्तरपत्रिकेत दिलेल्या त्या पर्यायाचा गोल काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने पूर्णपणे गिरवणे आवश्यक आहे. असे गिरविलेले उत्तरच तपासले जाईल याची नोंद घ्यावी.

१६.प्रत्येक प्रश्नाचे एक उत्तर बरोबर आहे. एकदा दिलेले उत्तर बदलता येणार नाही. आधी नोंदविलेले उत्तर पुसण्यासाठी खोडरबर, ब्लेड किंवा व्हाईटनरचा उपयोग करू नये.

१७.उत्तरपत्रिकेवर कच्चे काम किंवा खाडाखोड करू नये. कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक पृष्ठाच्या तळाशी व शेवटच्या पानावर दिलेल्या कोऱ्या जागेचाच वापर करावा. अन्य ठिकाणी कच्चे काम करण्यात येऊ नये.

१८.परीक्षेची विहित वेळ संपताच सोडविलेल्या आणि न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवा.

१९.उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे देऊन कार्बन प्रत (दुसरी प्रत) परत स्वतःकडे घ्यावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकच्या सूचनेशिवाय परीक्षागृह सोडू नये.

२०.परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत परिक्षार्थीस कोणत्याही कारणासाठी परीक्षागृहाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

२१.परीक्षा चालू असताना परीक्षेसाठी आवश्यक मान्य साहित्य वगळून इतर कोणतेही साहित्य परीक्षा गृहामध्ये नेल्यास / नेल्याचे निदर्शनास आल्यास अथवा परीक्षार्थी जवळ आढळल्यास त्याची चौकशी होऊन या परीक्षेशी संबंधित सर्व संपादणूक रद्द होईल. त्याचबरोबर त्याचे विरुद्ध “The Maharashtra Prevention of Malpractices Act 1982” अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

२२.परीक्षेसंबंधी दिलेल्या कोणत्याही सूचनेचा भंग केल्यास तो गैरप्रकार समजण्यात येईल.

२३.तोतया परिक्षार्थी आढळून आल्यास परिक्षार्थी व तोतया परिक्षार्थी यांचे विरुद्ध “The Maharashtra Prevention of Malpractices Act 1982” नुसार कारवाई करण्यात येईल.

२४.प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराची नोंद करू नये. प्रश्नपत्रिकेचे कोणतेही पृष्ठ / भाग मूळ प्रश्रपत्रिकेपासून वेगळा करू नये.

२५.परीक्षेसाठी विहित केलेली वेळ संपल्यानंतर परिक्षार्थीस प्रश्नपत्रिका स्वतः बरोबर परीक्षागृहाबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे. तथापि परीक्षेची वेळ संपेपर्यंत प्रश्नपत्रिकेची प्रत / प्रती किंवा प्रश्नपत्रिकेतील काही आशय कोणत्याही स्वरुपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम-८२यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

२६.परीक्षा काळात केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांचेकडून परीक्षेविषयक देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.

२७.प्रश्नपत्रिकेत त्रुटी आढळल्यास त्याबाबतचे निवेदन मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे नावे या परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकवर नोंदवावे.

२८.कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावा / करावे लागल्यास उर्वरित प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल.

२९.निकषानुसार परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र असणाऱ्या आणि उत्तीर्णतेचे (पात्रतेचे) निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारासच प्रमाणपत्र अदा केले जाईल याची नोंद घ्यावी.

३०.ऑनलाइन अर्ज नोंदणी असल्यामुळे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्यापूर्वी उपरोक्त प्रमाणे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व परिक्षार्थीच्या कागदपत्रांची व सर्व आवश्यक प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल. अंतिम निकालानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यामार्फत निकष पूर्ण करणाऱ्या सबंधित उमेदवारांना विहित केलेल्या नमुन्यात शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्यात येईल. पात्र परिक्षार्थीने ते समक्ष प्राप्त करून घ्यावयाचे आहे.

३१.परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.

३२.परिक्षार्थ्याने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड -19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग इत्यादी) पालन करून परीक्षा केंद्रावर हजर रहावे

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area