शेत रस्ता मंजूर यादी जाहीर झाली.
Matoshri
Gram Samrudhi shet panand raste yojana list 2022
मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022 राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
ही योजना राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास आज ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत
सर्व शेतांपर्यत मजबूत व दैनंदिन कामासाठी वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी 5
किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने
राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधबांधण्यात येणार आहेत
या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी अंदाजपत्रके बनवण्यात येत आहे. यामध्ये मनरेगा-कुशल घटक, अकुशल घटक राज्य रोहयो- कुशल घटक याप्रमाणे
खडीकरणासह
पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे – 23 लाख 84 हजार इतके
मुरमाच्या
पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे – 9 लाख 76 हजार रुपये इतके
होते. तथापि ज्या ज्या वेळी ‘डीएसआर’ बदलेल त्याप्रमाणे
अंदाजपत्रक बदलेल. शेत/पाणंद रस्ता तयार करण्यासाठीचे मापदंड निश्चित करण्याची कार्यवाही
सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्राम विकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार
करण्यासाठी विहित केलेले मापदंड लागू राहतील. रस्ते तयार करण्यासाठीच्या सुस्पष्ट सूचना
शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
मंजूर
रस्त्यांची सपूर्ण यादी /GR
शेत रस्ता मागणीसाठी ग्रामपंचायतकडे करा अर्ज
अनेक
शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही किंवा जो रस्ता आहे
त्यामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. तर अशा रस्त्यांसाठी शेतकरी ग्राम पंचायत
कार्यालयाकडे नवीन रस्ता मागणी किंवा रस्त्यात अडथला असेल तर तो दूर करण्यासाठी
अर्ज करू शकतात.
तुम्ही जर ग्राम पंचायतकडे शेत रस्ता
मागणी अर्ज केला तर ग्राम पंचायत रोजगार हमी योजनेतून हा रस्ता निर्माण करून देवू
शकतात. एखाद्या रस्त्याचा वाद असेल आणि तो वाद ग्रामपंचायतकडून मिटत नसेल तर
अशावेळी ग्रामपंचायत वादग्रस्त रस्त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करू
शकतात.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवू शकता. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मंजूर
शेत रस्त्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे ती बघून घ्या. तुमचे नाव त्या यादीमध्ये
नसेल तर तुमच्या गावातील संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.