नविन महा ई सेवा केंद्र सुरु करा.

नविन महा ई सेवा केंद्र सुरु करा.

 आपले सरकार -महा ई सेवा केंद्र आता आपल्या गावात सुरु करता येते, त्यासाठी खालील दिलेली किवा  pdf मधील माहिती वाचावी. आणि त्या मध्ये असणाऱ्या गाव मध्ये नवीन आपले सरकार -महा ई सेवा केंद्र सुरु करणे आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 19 मार्च 2022 आहे.

maha-eseva-kendra


जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा (ज़िल्हा सेतू डि आय टी विभाग )

जाहिरात क्रमांक - डीआयटी/सेतू/कावि./99/2022

एकूण केंद्र - 554

अर्ज भरणे सुरवात - 07 मार्च 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -19 मार्च 2022

अटी व शर्ती

1) उमेदवार हा CSC-SPV केंद्रधारक असावा किंवा किमान तो CSC-SPV केंद्र धारण करण्यास पात्र असावा.

2) CSC-SPV केंद्रधारक उमेदवार ज्या आपले सरकार सेवा केद्राकरिता अर्ज करित असेल त्या गावात किंवा वार्डात CSC-SPV चे केंद्र असणे बंधनकारक आहे.

3) CSC-SPV केंद्र धारकाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 

4) एका उमेदवाराला एका पेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही. CSC-SPV केंद्र धारक यांचे ज्या गावामध्ये किंवा वार्डामध्ये CSC-SPV केंद्र आहे त्याच ठिकाणाचा अर्ज ग्राहय धरण्यात येईल.तसेच ज्या उमेदवराकडे CSC-SPV केंद्र नाही ते उमेदवार ज्या गावचे रहीवासी आहेत त्याच गावातील किंवा वार्डातील अर्ज ग्राहय धरण्यात येईल.

5) यासोबत तालुका निहाय यादी प्रसिध्द करण्यात येत आहे त्यानुसारच Online  अर्ज ग्राहय धरण्यात येईल.

6) एका केंद्राकरिता एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास CSC-SPV केंद्रधारक उमेदवाराचे मागिल दोन वर्षाचे Transaction विचारात घेवुन ज्या CSC-SPV केंद्र धारकाचे सर्वाधिक Transaction असतील त्यांना नियुक्ती देण्यात येईल.

7) उमेदवाराकडे Shop act Licence किंवा ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामिण भागासाठी) असणे आवश्यक आहे.

8) उमेदवाराकडे किमान 100 sq.foot जागा असावी (मालकीची अथवा भाडेपटटयाची)

9) उमेदवाराकडे चारीत्र पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (संबधीत पोलीस स्टेशन)

10)   केंद्र मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास संबंधीत उमेदवाराचा अर्ज रदद करण्यात येईल.

11)   अर्जामध्ये नमुद केलेले सर्व मुळ कागदपत्रे पडताळणी करतेवेळी उमेदवारास सोबत घेवुन येणे़ बंधनकारक आहे.

12)   आपले सरकार सेवा केंद्र यांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत.

13)   वेळोवेळी आवश्यक त्या सुचना www.buldhana.nic.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येतील त्या सुचना बघण्याची व त्यानूसार कार्यवाही करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल

 कोणत्या गावात सुरु करता येते महा ई सेवा केंद्र त्यासाठी खालील यादी पाहावी

(ads1)

महा ई सेवा केंद्र

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.

अर्ज भरण्यासाठी

येथे पाहा.

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area