बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु :
Biyane anudan MahaDBT maharashtra
Biyane
anudan maharashtra संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
शेतीमधील
कामांची सध्या मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. पेरणीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले
आहेत. अशावेळी शेतकरी खते खरेदी करणे, बियाणे खरेदी करण्याच्या तयारीला लागलेले आहेत.
(ads1)
(ads1)
शेतीसाठी
लागणाऱ्या बियाण्यांच्या व खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस
महागाई वाढत चाललेली आहे. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर
नक्कीच तुमच्या खर्चाची बचत होऊ शकते.
बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर बियाणे कसे मिळते. बियाणे कोणत्या ठिकाणी मिळते या संदर्भातील संपूर्ण माहितीची लिंक देखील आपण खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला या बियाणे अनुदान योजनेची माहिती समजून घेण्यास मदत मिळेल.
(ads1)
शासकीय अनुदानावर
बियाणे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
हा अर्ज अतिशय सोपा असतो. अर्ज हा https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट कार्याचा आहे.
(ads1)
(ads1)
- ·
लॉगीन
करा.
- ·
लॉगीन
केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- ·
दिसणाऱ्या
अनेक योजनांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर
क्लिक करा.
- ·
या
ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येतो. १) पिक
प्रात्यक्षिक बियाणे २) प्रमाणित बियाणे.
- ·
पिक
प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जाते
- ·
प्रमाणित
बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
- ·
बियाणे
औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरा.
- ·
विविध
पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
- ·
अर्ज
व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
- ·
पहा या
बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या.
- ·
अर्ज करा
या बटनावर क्लिक करताच 23.60 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- ·
दिलेल्या
पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
- · पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.