बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनां एकूण 51,000 अनुदान.
मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरीता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.
मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.
नवीन बांधकाम कामगार योजना खालीलप्रमाणे
1)बांधकाम कामगाराच्या एका
मुलीच्या विवाहाकरीता ५१००० रुपये अनुदान देण्यात येईल.
2) जर बांधकाम कामगाराचा
अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी
पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ करणार आहे.
3) काम करत असतांना बांधकाम
कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अर्थसहाय्य दिले
जाणार आहे.
पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना
§ बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता
इयत्ता १ पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
§ कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय
शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सहाय्य केले जाते.
§ बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो
म्हणजेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
§ कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी
बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले
जाते.
§ बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.
§ ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या
भागामध्ये त्या भागातील कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले
जाते.
MAHABOCW |
|
अधिकृत वेबसाईट |
|
लागणारे सर्व अर्जाचे नमुने |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|