शेत जमीनीवरील अतिक्रमण सरकारी नियमाने काढा Agri Land Atikraman Sheti Jaminivaril Atikraman

 शेत जमीनीवरील अतिक्रमण सरकारी नियमाने काढा

Agri Land Atikraman

Sheti Jaminivaril Atikraman


 

नमस्कार या लेखामध्ये आपण शेत जमीन अतिक्रमण कायदेशीर मार्गाने कसे काढले जातात या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जमिनीवर अतिक्रमण केलेलं असते. अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर ताबा करणे आणि ती जमीन आपलीच आहे असे भासवले जाते.

शेतामध्ये जर खुणा नसेल तर अशा ठिकाणी अतिक्रमण जास्त प्रमाणात केले जाते. नंतर काही लोक पैशाचा मोबदला किंवा जमीनीचा थोडासा भाग आपल्याला मिळेल म्हणून बरेच अतिक्रमण करतात. अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाद वादविवाद सुरु होण्यास सुरुवात होते.


शेत जमीन अतिक्रमणमुळे होऊ शकतात वाद.

शेतकरी बंधुनो बऱ्याच शेतकऱ्यांना जमिनीवर झालेले अतिक्रमण कसे काढावे ह्याची कल्पना नसते. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची होऊन बऱ्याच ठिकाणी हाणामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद टाळून कायदेशीर आपण आपल्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवू शकतो.


आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी करणे आवश्यक आहे. मोजणी झाल्यानंतर आपल्याला हद्द कायम नकाशा क प्रत मिळते आणि त्याच्यावर अतिक्रमण क्षेत्र दाखविले जाते.

बरेच शेतकरी मोजणी भरून सुद्धा अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसतात. तेव्हा बरेच शेतकरी हे कोर्टाचे दार ठोठावतात. परंतु आपण जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये आपले प्रकरण सादर करतो तेव्हा तिथे प्रकरणाला विलंब लागू शकतो.

 हे पण वाचा - शेत रस्ता मंजूर यादी जाहीर झाली


जमिनीचे अतिक्रमण प्रकरण विलंब लागू नये म्हणून महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३८ नुसार आपण तहसीलदारकडे अतिक्रमण काढून घेण्यासाठी अर्ज करू शकतो. जमिनीचे अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा अर्ज तुम्हाला हवा असेल तर या लेखाच्या शेवटी तो अर्ज नमुना दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता.


आवशयक कागदपत्र

महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३८ नुसार आपण तहसीलदारकडे आपल्याला अतिक्रमण काढून देण्यासाठी अर्जाबरोबर खालील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

·       अर्जदाराच्या ज्या शेत जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या लगतच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्याच्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा हा अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

·       अर्जदाराने जर त्यांच्या जमिनीची शासकीय मोजणी केली असेल तर त्या जमिनीचा शासकीय मोजणीच्या नकाशाची छायांकित प्रत किंवा मूळ नकाशा कागदपत्रांसोबत जोडावा.

·       अतिक्रमित केलेल्या जमिनिचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा हा अर्जासोबत जोडावा.

·       जर अतिक्रमित जमिनीच्या प्रकरणाचे न्यायालयामध्ये वाद सुरु असतील तर संबधित सर्व कागदपत्रे तहसीलदारकडे जमा करणे आवश्यक आहे.

     हे पण वाचा - शेत रस्ता मंजूर यादी जाहीर झाली


तर शेतकरी बंधुंनो वरील प्रमाणे सांगितलेले सगळे कागदपत्रे शेत जमिनीवर झालेलं अतिक्रमण कायदेशीर मार्गाने काढण्यासाठी अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे.

अर्जामध्ये अर्जदाराने गट नंबर तसेच सर्वे नंबर आणि चतु:सीमा टाकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अर्जास प्रोसेस फी म्हणून योग्य किमतीचा कोर्ट स्टँप लावावा आणि तहसीलदार कार्यालयातून पोच घ्यावी. जितके जाब देणार असतील म्हणजे ज्यांनी अतिक्रमण केले आहे तितक्या अर्जाच्या आणि कागदपत्राच्या प्रती सदर करणे गरजेचे आहे.

शेतजमिनीमधील अतिक्रमण काढण्यासाठी अर्जाचा नमुना


 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area